Duration 4500

२०२४ मध्ये देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार येईल-केंद्रीय मंत्री रामदास आठवले

257 watched
0
1
Published 28 Aug 2021

२८.०८.२०२१ : केंद्र सरकारनं अनेक योजना राबवल्या असून त्याचा फायदा अनेक गोरगरिब जनतेला झाला आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष एकवटले तरी २०२४ मध्ये देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार येईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज सातारा इथं आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. केंद्र सरकारनं राबवलेल्या अनेक योजनांचा आढावा आज आठवले यांनी सातारा इथं घेतला. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींच्या आरक्षित जागा आवश्यक आहे. त्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, ही आपली भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Category

Show more

Comments - 0